हिन्दी
येशू माझा मेंढपाळ
आम्ही त्याची मेंढरे
हिरव्या कुरणांत
आम्हाला चारितो
येशू माझा मेंढपाळ...
सुंदर डोंगरावरुनी नेतो
मंजुळ झरण्याचे पाणी पाजितो ... (2)
येशू माझा मेंढपाळ...
मार्गात रक्षण आमुचे करितो
शैतानापासून दूर ठेवितो ... (2)
येशू माझा मेंढपाळ...
भिणार नाही आम्ही आता कोणाला
ख्रीस्तच आहे आमुच्या संगतीला ... (2)
येशू माझा मेंढपाळ...