हिन्दी
किती आनंद हा, किती आनंद हा
प्रभू येशू नि दिला, आम्हा
अती भरपुरतो, मति धुंद करितो
वर्णन करण्या न पुरे जिवा
किती आनंद हा...
प्रितीने स्वीकारिले, अयोग्य ह्या पामरा
पापाच्या परीतुनी, वर आणिले मला हो हो ... (2)
किती आनंद हा
धावत होतो वेगे, नाशाकडे मी जरी
बोलावूनी मजला, दाविले प्रेम तरी हो हो ... (2)
किती आनंद हा...
तुझी वाणी एकण्या, जवळ घेशिल का
हृदय टेकावया, जीव अधीर् जाला
किती आनंद हा...