Kristh Majha To Sarvancha

हिन्दी

ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नमा त्याला तोच आपुला तारणारा या स्तवा त्याला ख्रिस्त माझा तो सर्वांचा... तो जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा... (2) क्रूसावरती अर्पूनी प्राणा उठला तारायला ख्रिस्त माझा तो सर्वांचा... तो राजांचा राजा येशू अधिपती या भूवनीचा अद्भूत मंत्री, देव समर्थ पिता सनातन आमुचा ख्रिस्त माझा तो सर्वांचा... ख्रिस्त दाता, शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा एकच वैध्य जगती हाची दैवी आरोग्याचा ख्रिस्त माझा तो सर्वांचा... त्याचे व्हावे मनी जयांच्या स्वीकाराहो त्याला जगदुद्धारक, जीवन सत्य आळवा नित्य त्याला ख्रिस्त माझा तो सर्वांचा...