ख्रिस्त माझा तो सर्वाचा, या नमात्याला

मराठी

ख्रिस्त माझा तो सर्वाचा, या नमात्याला तोची अपुला तारणारा, या स्तवा त्याला तो जगाचा त्राता पालक मालक या विश्वासाचा क्रुसावरती अर्पुणी प्राणा उठला तारायला (१) तो राजांचा राजा येशु अधिपती या भुवनीचा अदभुत मंत्री देव समर्थ पिता सनातन अमुचा (२) ख्रिस्त दाताशांती प्रितीचा, अविरत आनंदाचा एकचं वैध जगती आहे, दैवी आरोग्याचा (३) त्याचे व्हावे मनी जयाच्या स्विकारा हो त्याला जग उध्दारक जिवन सत्य अलवा नित्य तयाला (४)