ख्रिस्त राज्याची सुर्वाता

मराठी

ख्रिस्त राज्याची सुर्वाता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गर्जाल का ॥धृ॥ घ्या वीना हाती टाल मृदुंग आलवा प्रेमे होउनी दंग त्या प्रभुचा थोर महिमा गाऊन दावाल का? ॥१॥ संकटे येता जो करी साथ येई धावोनी दे क्षणी हात त्या प्रभुला प्रेमभावे अंतरी ठेवाल का? ॥२॥ दाविली प्रति त्यागुनी प्राण जिंकिले वेगे मृत्यू सैतान तो जगाचा तारणारा ख्रिस्त सांगाक का? ॥३॥ या अहो कष्टी या भाराक्रांत घ्या विसांवा घ्या सौख्य नितांत दीन बंधू या जगाचा हा सांगाल का? ॥४॥