जसा मी आहे निराधार

मराठी

जसा मी आहे निराधार आलो तसाच, दे उध्दार की वाहे तुझी रक्त धार देवाच्या प्रिय कोकरा ॥१॥ आलो तसाच, करू काय व्हायास शुध्द हीनोपाय तुझेच रक्त दे साहाय देवाच्या प्रिय कोकरा ॥२॥ आलो तसाच भ्रांति फार, व्हावा ज्गांत दुर्निवार घेरिते संकटे अपार, निवारी प्रिय कोकरा ॥३॥ आलो तसाच अंधला, दुःखी दरेद्री दुबला साठा तुझाच संगला पुरीव, प्रिय कोकरा ॥४॥ अशास तू स्विकारिशी क्षमा सप्रेम करिशी कि बोलणे न मोडिशी देवाच्या प्रिय कोकरा ॥५॥ तुझ्या प्रेमेच जिंकिले या ह्र्दयास चेचिले आता मी सव सोपिले तुला हे प्रिय कोकरा ॥६॥