जीवनाच्या सागरात

मराठी

जीवनाच्या सागरात सुखा- दुःखांची लाट नाव माझी डोलते पाण्यावरी ॥धृ॥ कधी सैतानी वारा येतो, धक्का ह्र्दयाला मारुनी जातो पडे दुःखाचा डोंगर डोईवरी..(१) कधी दुःखाला येते भरती कधी सुखाला लागे ओहोटी येते संकट चालत लाटावरी..(२) माझ्या नावेत येशु असता, मला नाही कशाची चिंता आहे सुकानु मांझ त्याच्या हाती..(३) धोक्याचा सुटला वारा वारा सागरी उसले लाटा लाटा नाव कशी जाईल पैलतीरा..(४)