पुष्कल अजुनी उणा प्रभु, मी,

मराठी

पुष्कल अजुनी उणा प्रभु, मी, पुष्कल अजुनी उणा रे.. ॥धृ॥ खंडीतुन रति नाहि फेडिले बंधुभगिनीच्या ऋणा रे ॥१॥ तुझा ऋणी तर सदाच राहिन, अगा पतित पावना रे ॥२॥ किती लाजतो मनात ठाऊक तुजवाचुन हे कुणा रे ॥३॥ असे करावे, तसे करावे, वायां मम वल्गना रे ॥४॥ टाकाऊ मी परंतु सदया, आवडलो त्वन्मना रे ।।५॥ जसा पाहिजे तुला तसा मी करू कसा आपणा रे? ॥६॥ ख्रिस्ता, ख्रिस्ता घे घे अवघा हा माझा मी पणा रे ॥७॥