प्रिती विना जीवन सुना

मराठी

प्रिती विना जीवन सुना झांझही वाजे झाणा- झणा हा हा हालेलुया.. हो हो होसन्ना हालेलुया हालेलुया.. ॥धृ॥ प्रिती कधी रूसत नाही प्रिती कधी फुगत नाही गैरशिस्त वागत नाही बढाई मारत नाही (१) विश्वासाने डोंगर ढलतील, दुतांच्या भाषा बोलतील प्रिती जर नसली तर, संदेश रद्द होतील (२) प्रिती सहनशील आहे, उपकार स्मरत नाही सर्वाची आशा धरते, सर्व सम्बधाने धीर धरते (३)