प्रेमाची ही पाखरे, ख्रिस्ता तुझी लेकरे

मराठी

प्रेमाची ही पाखरे, ख्रिस्ता तुझी लेकरे इकडून तिकडे, तिकडून इकडे भूर्रकन उडती चोहीकडे सुवार्ता जगी वितरे, ख्रिस्ता तुझी लेकरे (१) एकच फांदी क्रूस खाबांची, त्या फांदीवर वस्ती अमुची स्वर्गात अमुची घरे, ख्रिस्ता तुझी लेकरे (२) पाय सुखाच्या मार्गावरती जगतो आम्ही वचनावरती हर्दयात हर्ष भरे, ख्रिस्ता तुझी लेकरे (३) तव नामाचे गुंजन ओठी तुझ्याच करीतो आम्ही गुज गोष्टी वेड आम्हा लागले, ख्रिस्ता तुझी लेकरे हालेलुया.. हालेलुया.. (४)