प्रभु ख्रिस्ता तू कूपेने लग्न नेम लाविला

मराठी

प्रभु ख्रिस्ता तू कूपेने लग्न नेम लाविला येऊनी आता दयेने । आशिर्वाद दे आम्ही नौरानौरी या दोघाना । तुझी कृपा दाखावी प्रेम दे उभयंताना । ते अखंड वाढवी ॥१॥ तुझी कृपा पावनाता । ही वंदोत तुझे नाव सुमार्गात चालताना । दाखवीत प्रेमभाव प्रिय प्रभु तु दयालु । दुःखे वारी नेहमी ॥२॥ रोज रोज यांच्या घरी । स्तुती भक्ती होवो फार तुझी कृपा झाला तरी । ही मानोत उपकार भव दुःखे लागताना । करी त्यांचा तू निभाव ही आधार मागताना । वेगे होऊ दे बचाव ॥३॥ अंतः काली बोलावूनी । त्यांचा करिशी वियोग तेव्हा पुन्हा मिलवूनी । वते दे सत्सुख भोग प्रिय प्रभु मम्तालू । दे भक्तीची भावना स्तवू तुला दे दयालू । गाऊ तुझी करुणा ॥४॥