भोजन देई पाच हजारा

मराठी

भोजन देई पाच हजारा प्रभू बसल्या, बसल्या टोपल्या बारा त्या उरल्या .. ध्रु जमले होते वनात सारे बाया, पुरुष आणि लेकरे पन्नासच्या बसवून रांगा वाढे प्रभू त्या भुकेल्या .. १ व्याकुळ झाले वृद्ध भुकेने मणी जाणले प्रभू रायाने सोडूनि द्यारे प्रपंच आपुला प्रभुजी सांगे तयाला .. २ चमत्कार हा अजब हो केला साक्षात्कार झाला मनाला प्रभू राया विन, प्रभू राया विन भिन्न दिशा जाहल्या .. ३