प्रभू आला घरी नाच माझ्या मना

मराठी

प्रभू आला घरी नाच माझ्या मना हर्ष माझ्या जीवाचा मी सांगू कुणा .. ध्रु झाड उंबराचे होते त्या वाटेवरी गर्दी पाहुनी चढलो त्या झाडावरी येत असता प्रभू तो दिसे लोचना .. १ टक लावूनी येशू बघे मजकडे बोले जक्कया उत्तर खाली तु तातडे त्याला बघताच झाला स्वर्ग ठेंगणा .. २ स्वागताची तयारी जाहाली सुरु सांगा कैसी प्रभूची मी सेवा करू त्याच्या प्रेमाची आली मला कल्पना .. ३