आकाशाहून उंच पलीकडे

मराठी

आकाशाहून उंच पलीकडे आहे मला घरकुल नवे .. ध्रु विपुल असतील महाल तेथे ख्रिस्त प्रेम जे राहिल तेथे धावत येतील दूतांचे थवे आहे मला घरकुल नवे .. १ इस्राएल चे महाआरण्य मुक्कामी होते मोशे सेवक जिवंत असतां स्वर्गी वैभवें आहे मला घरकुल नवे .. २ मन पाखराची उंच भरारी जाईन आता प्रभू निवासी ख्रिस्त पहातो ठेवी अंतरी आहे मला घरकुल नवे .. ३