तू वैभवाने जेहवा, येशील येशू देवा

मराठी

तू वैभवाने जेहवा, येशील येशू देवा या दिन पामराला विसरू नकोस देवा .. ध्रु गेलास क्रुसावरी, पाप्याला तूच तारी, तू जीवनाचा ठेवा आहेस येशू देवा या दिन पामराला विसरू नकोस देवा .. १ तू जीवनाचा झरा, अमुचा आधार खरा हृदयात तू असावा करितो तुझा मी धावा या दिन पामराला विसरू नकोस देवा .. २