करा प्रार्थना अखंड,

मराठी

करा प्रार्थना अखंड, नका पडूं देऊं खंड १ होतां प्रार्थना विश्वासू, येतें अंत:करणां हांसू २ प्रार्थनेचें मोठें बळ, नाशी संकटां समूळ ३ प्रार्थनेनें देवमैत्री, होती जैसी पत्रोपत्रीं ४ येतो प्रार्थनेचा त्रास, होतां सैतानाचा वास ५