करीं क्षमा या जनां, बापा

मराठी

करीं क्षमा या जनां, बापा करिती काय न समजे त्यांना" ध्रु. क्रूसावरती खिळिलें ज्यांनी ! बोल न लावी त्या प्रभुवाणी, विनवोनी परि देवा लागुनी करीतसे याचना १ सौजन्याचा कळस न हा का क्रूसीं खिळिलें धरुनी हेका प्रेमानें त्या बघणें लोकां काय म्हणूं या गुणा ? २ प्रभो, देतसे क्रूसीं तुला मी करी अनन्वित छळहि नेहमीं, अजाणतां हें देऊं कशी हमी ? अगा, सूक्ष्म लोचना ? ३ निवडचि केली बारब्बाची तशी करी मी न योग्य त्याची डोळे उघडे ठेवुनि; साची असे मला कल्पना ४ तरी, प्रभो, मज आहे अनुभव प्रेमलतेचा, करुणेचा तव क्षमा याचना ही माझ्यास्तव असे भरंवसा मना ५