किति गोड ! किती रे गोड !

मराठी

किति गोड ! किती रे गोड ! नाम तव वाटे, मन प्रेमरसाच्या उले खळखळाटें ध्रु. सहवास, पुरे तव ह्यास, स्वर्ग मग येशू, - नच दुजा, दाखवी चरण तुझे आशू १ हृत्पटीं, तुझी गोमटी, मूर्ति वसलेली, ती उभीच माझ्यापुढें असो केली २ तूं, प्रेम ! मूर्त तूं प्रेम, प्रेम तूं देवा ! प्रभु, रूपा येशी धरुन येशू नांवा ३ मन्मना, एक वासना, तुझ्यासह जावें, हें आयु येथलें तुझेंच तें व्हावें ४