चला चला जाऊं,

मराठी

चला चला जाऊं, जगाचा उद्धारक पाहूं - ध्रु "परमोच्चावर गौरव शांती ह्या धरणीवरती, कृपा नरावर," परमोत्साहें देवदूत गाती, प्रतिध्वनीनें ग्रह हे सारे व्योमीं दणदणती; चला गीत तें आपणही गाऊं- १ भविष्यवादी स्वर्गी सारे लागती नाचाया, साधेभोळे मेंढपाळही लागति धांवाया पूर्वेकडुनि साधु निघाले प्रभुला भेटाया, चला दर्शना आपणही जाऊं- २ प्रीती आली देह धरोनी आम्हां ताराया, हस्त धरोनी मृतांस आम्हां पुनरपि उठवाया, "जयजय येशू" ह्या मधुघोषें भुवना व्यापाया; प्रभुला हृदयीं सांठवुनी घेऊं- ३