जगिं तारक जन्मा आला

मराठी

जगिं तारक जन्मा आला चला, पाहुं चला हो त्याला -ध्रु. नृपवैभव घेऊनी नाहीं, कीं अन्य अलौकिक काहीं, तो दीनच जन्मा आला जगिं दीनां तारायाला, -१ जरी सर्व तमाला सारी तरि नाहिं प्रखरकरधारी, तो सौम्यच जन्मा आला जगि पाप्यां तारायाला -२ जरि शब्द देव जो होता तो तनुला झाला धरिता तरी दैवि रूप नच ल्याला प्रीतीस्तव आमुचा झाला -३ हें आकाशातुन खालीं नवजीवन हो उडि घालीं घ्या देहि सांठवुन याला जय येशू ! जय ! जय ! बोला -४