जा सांगा मम बंधुजना,

मराठी

जा सांगा मम बंधुजना, आलों जिंकुनियां मरणा -ध्रु मरणाची मोडुनी नांगी मारियलें सर्पां सोंगी भीति कुणाची नुरली साजी, ही नवलाची क्रांती घडे जगतीं जाणा, विजयी मी तुमचा राणा -१ कां बसलां दडुनी मागें ? निजलां कां तरि ? व्हा जागे सोडुन धुंदी बहु आनंदी साधा संधी गा शुभवृत्ताच्या गाना, कळवा तारण वरदाना -२ जातो पुढतीं, या मागें हेंच तुम्हापाशीं मागें मार्ग मोकळा झाला सकळां, खलचांडाळां दावा स्वर्गीचा जिना, आणा सुखलोकीं दीना’-३