तन मन धन, प्रभू, तव चरणी

मराठी

तन मन धन, प्रभू, तव चरणी सकल तुझें हें तूंच दिलेंसी, अघटित तव करणी -ध्रु. माझें हें, तें मीच मिळविलें समजतसें अभिमानें पूर्वी, आतां खेद मनीं -१ मी, मम जाया, कन्या, सुत हे दास तुझ्या चरणांचे सारे, प्रियकर तूंचि धनी -२ बेत विचारहि, हर मम करणें अवलंबे इच्छेवर तव बा, करितों मनधरणी -३ वाट, खरेपण, जीवन मम तूं शरणांगत मी पतित तुला गा जय दे भवतरणी -४