तव सहवास घडावा, प्रभु रे,

मराठी

तव सहवास घडावा, प्रभु रे, क्षणभर विरह नसावा -ध्रु. राहो सुंदर सदनीं नगरीं, किंवा रानीं पर्वतकुहरीं देह विभो हा माझा, कोठेंहि मग स्वर्गच जीवा -१ मिळोत षड्रस अन्नें खाया, कंदमुळें वा, मज प्रभुराया, तूं जवळी मम असतां, अमृतानुभवच मज तो व्हावा -२ मृदुल फुलांची सुखकर शय्या, किंवा प्रस्तरखंड निजाया हृदया तव टेंकोनी, असतां कष्ट न शब्दहि ठावा -३ हे प्रिय कंदा सर्व सुखाच्या, घे घे माझें तन, मन, वाचा ख्रिस्ता ! मत्प्रिय ख्रिस्ता, अविनाशी तूं मात्र विसांवा -४