तुज सोडुनि ख्रिस्ता जाऊं कुठें -ध्रु

मराठी

तुज सोडुनि ख्रिस्ता जाऊं कुठें -ध्रु विरह तुझा रे नरक भयंकर, भासे प्रलयानल पेटे -१ धर्मरवी तूं क्षणभर नसतां, मम हृत्कोशी तम दाटे -२ तुजवांचुनिया मार्ग जगीं ह्या, मज दिसती तितुके खोटे -३ पापी खटनट मीं मज माझें, तुजविण भारी भय वाटे -४ उलटें मन्मन तुजविण दुसरा, कोण जगीं ह्या करि सुलटे -५ मम जीवन तूं जगदुद्धारा, मेलोसें तुजविण वाटे -६ सहवासाहुन तुझ्या मला रे, स्वर्गाचें सुख नच मोठें -७