नको प्रभू, तरि मजला सोडूं,

मराठी

नको प्रभू, तरि मजला सोडूं, शरण पतित मी तुजला रे -ध्रु क्षणोक्षणीं मीं पापें करितों, मन हें मज अकळेना रे काय करुं ? हा जिव तगमगतो तव पदिं नहीं रुजला रे -१ सुभावनेची, कुभावनेची हृदयीं झटपट होतां रे, कुभावनेला वश मी होतों, वण माझा ना तुजला रे -२ अरे, अरे, मी माणुस कष्टी मर्त्य तनूपासुनिया रे कोण वरी मज मुक्त, दयाळा तुजविण जिव हा सुजला रे -३ अमुच्या प्रभु ख्रिस्ताकडुनी मी स्तुति करितों देवाची हो, स्वतां मला प्रभुसेवा अवडे, पण हा देहच कुजला रे -४