न:म परम मंगला

मराठी

न:म परम मंगला गौरवूं तुला; परम वत्सला -ध्रु. ध्याऊं, गाऊं पुजूं वाहुनी प्रेमाश्रूंच्या फुला ! गौरवूं तुला, परम वत्सला-१ जगत्कारणा बापा, न कुठें तव वात्सल्या तुला ! गौरवूं तुला, परम वत्सला-२ जगत्तारणा पुत्रा, अनुपम तुझी कृपा निर्मला ! गौरवूं तुला, परम वत्सला-३ जगच्चालना, पवित्र आत्मन् हो मम जीवनकला ! गौरवूं तुला, परम वत्सला-४ अगा अद्वया, सदा अनुभवूं तुझ्या त्रिविध भूतिला ! गौरवूं तुला, परम वत्सला -५