मराठी
पतिता, ये, चल शुचि व्हायाला,
प्रभु येशुपदास धरीं,
अघसिंधूमधुनि तरायाला
प्रभु येशुकृपाच तरी
ध्रु-प्रभुच्या.. प्रभुच्या..
प्रभुच्या धर वंद्य पदा;
जगदुद्धारक गुरूराजाच्या
न दुजा पथ मुक्तिपदा
प्रभु येशू क्षितीवरि आला या,
बघ तोचि समर्थ सखा,
अघपाशा झडकरी तोडाया
तुज देईल नित्य सुखा
म्हणवी तो पतितसखा, देई
अघमुक्ति विनम्र जनां
म्हणुनी तूं शरण तया जाई,
प्रभु देईल शांति मना
मनुजांच्या हरि अवघ्या तापा
प्रणतीं करूणा करितो,
प्रभुपाशीं चल त्यजुनी पापा
शरणगततारक तो