पहा हो दूत कसे गाती,

मराठी

पहा हो दूत कसे गाती, "परमोच्च्यावर गौरव शांती ह्या धरणीवरती"-ध्रु "नरावर कृपा होय" वदती, जयजयकारें व्योमी सारे ग्रह हे दणदणती-१ प्रीती नांवरुप धरिती, दीन नरास्तव दीन होउनी ह्या भुवनीं येती-२ हिर्‍यासम रवि जीच्यावरती तीच अंगुली मुखीं घालुनी लघुगोष्ठीं रमती-३ ख्रिस्ता, तव अंगुली फिरती तसें फिरावें, हीच निरंतर दे आम्हां वृत्ती-४