प्रभु तव नाम सुवंदित गावें -ध्रु

मराठी

प्रभु तव नाम सुवंदित गावें -ध्रु मत्य पतित मी, वंदुनि तुजला मी चिरकाल जगावें -१ त्वदितर ऐसा कोण ! जयाला गाउनि नित्य तगावें -२ निशिदिनिं करिसी, उपकारच तूं हे कां मीं उमगावें -३ मज ताराया, ख्रिस्त दिलासी, तर तुज मीं उमगावें -४ देसि सदात्मा मजला, की मीं तव मार्गी न डगावें -५ सदया मज दे दान असें कीं, तव मुख नित्य बघावें -६