प्रभु, मज तारण दे पतिताला -ध्रु

मराठी

प्रभु, मज तारण दे पतिताला -ध्रु पुण्य नसे, प्रभु, संग्रहिं माझ्या, पाप परी अहिताला -१ दडपतसें मीं बहु अघभारें जाइन मृत्युपथाला -२ वैद्य नसे प्रिय तुजविण ऐसा सुधरिल पापक्षतांला -३ सर्वसमर्था, इच्छिसि तूंही, स्मर तर याहि तिताला -४ काय करुं मी सांग मला, प्रभु सुख व्हाया जिविताला -५ पतितांचा तू मित्र, अहा, दे कान विनंतिगीताला -६