प्रभु, मी कोणाचा, कोणाचा ?

मराठी

प्रभु, मी कोणाचा, कोणाचा ? माझा नच इतरांचा -ध्रु. तुझाच परी मी घे घे माझीं, तनु मन धन जी वाचा, बंधमुक्त तूं केलें मीना, मज तूं निधि करुणेचा -१ पापात्म्याची असह्य अधिकृति ! सांगूं किती त्या जाचा ! सोडविलें तूं विषकीला मज, सिंधु देशि अमृताचा -२ हस्तपाद हीं पांच इंद्रियें, आत्मा प्राणहि यांचा तवाधीन बा झाला झाला ! प्रिय ताता प्रणताचा