मराठी
प्रभो, वैभवाने, येशील माघारा,
स्मर या पामरा, तेव्हां राया
लुटालूट चोर्या, केल्या जन्मभरी,
माझा मीच वैरी, झालों ख्रिस्ता
मातेरें जन्माचें, केले मी सर्वस्वी,
आतां हो मनस्वी, पश्चात्ताप
तुझ्या पायावरी, घेतों लोटांगण,
देई रे तारण, दीनाला या
ऐकुनिया टाहो, असा त्या चोराचा,
द्रवला देवाचा, पुत्र फार
’अधोलोकीं आज’, प्रेमें ख्रिस्त सांगें
"असशील, संगें माझीया तूं"