मंगल चिंतन, मंगल दर्शन,

मराठी

मंगल चिंतन, मंगल दर्शन, मंगल तव गुणगान, मंगल सेवा, मांगल्याचें, देवा, तूंच निधान ! -१ अंतर्यामीं, खालीं, वरतीं, मागें, पुढतीं उर्मी, प्रेमसागरा तुझ्या, खेळती मीन त्यांतले आम्ही -२ हें तृण, हे तरु, हे गिरि, हे नभ, विश्व दिसें, न दिसे तें त्या प्रेमाच्या मधुलहरींनीं थबथबलेलें नुसतें ! -३ मी तव, माझें गान तुझें, हें ऐकणार जे तेही तुझेच, देवा ! तुझेंच तूं हें सांभाळुनियां घेई -४ राज्य तुझें, तव महती अवघी, बल, विक्रम तव, देवा ! एक सुखद अधिकार आमुचा, कीं करिजे तव सेवा !-५