मरणच मेलें,

मराठी

मरणच मेलें, प्रभु माझे विजयी झाले ! -ध्रु पश्चिम नटली, पूर्वहि नटली वर दूतांचीं सैन्यें भरलीं, अनुरागामधिं प्रीति रमली मरणच रडलें ! -१ शवगर्ता ती हसूं लागली, निसर्गानें फुलें उधळलीं, संतमहंतें शिरें लवविली भक्‍तहि नमले -२ उत्थित प्रभुला नमन करुं या, नवसुमनांची माळ अर्पु या, गाणिं मनोहर त्यांस गाउं या, हृदिं मम बसले