माझ्या प्रभूला ठेवियेलें कोठें

मराठी

माझ्या प्रभूला ठेवियेलें कोठें माळी दादारे, माळी दादा ? -ध्रु क्रूर जनांनीं त्याला मारीयेलें, ह्याच थडयांत त्याला ठेवीयेलें, काल शब्बाथिं येणें नाहीं झालें, झालें -१ पाहूं गेलें रे थडयांमधीं जेव्हां, प्रेतवस्त्रें व दूत होती तेव्हां, प्रिय माझा तारक नेला केव्हां, केव्हां -२ दिव्य गौरव सोडुनीया आला, श्रेष्ठ असूनी फार लीन झाला, प्राण अर्पीला जन तारायाला, याला -३ मोठ्या पहाटिं उठलें रे आज, आलें करुनि सारें कामकाज, कधीं भेटेल माझा महाराज, राज -४ तेल सुगंधी आणिलें रे भाऊ, आतां कोणाला लावायाला जाऊं सांग त्याला मी कुणिकडे पाहूं, पाहूं ?- ५ आहा सद्गुरुविण सारें कडू, कोण उध्दरि कोणाआड दडूं डोळे शिणले माझे रडूं, रडूं, रडूं -६ माळी बोले, "का रडतेस बाई, कोणा शोधिसि फार घाई घाई ?" मार्या बोले, "मी करुं गत काई, काई ?"-७ तेव्हा माळी बोलला, ‘अगे मार्या ! मार्या ओळखूनि म्हणे, ‘गुरुवर्या’ भेट होतांच म्हणे ना ‘मार्या, मार्या ! -८ प्रभु आग्रह, प्रीति, भाव पाही, देई अशांस भेट लवलाही, अशा शोधांत मन माझें राही, राही -९