मिळो वा ना मिळो आम्हा अन्नपाणी

मराठी

मिळो वा ना मिळो आम्हा अन्नपाणी देवाच्या चिंतनी मग्न आम्ही -ध्रु अंगावर चिंध्या असोत नसोत तसेच जगात राहू अम्ही -१ फ़ुलांचे शयन किंवा कंटकांचे इच्छेने देवाचे एक अम्हा -२ वधस्तंभावर आम्ही टांगलेले तेथेच मिळाले सर्व आम्हा -३ दास म्हणे ख्रिस्त केले आम्हा मुक्त सेवनी आसक्त झालो त्याच्या -४