मी वेचिले फुलांना

मराठी

मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले (२) जखमी करुनि तुजला मला सर्वरे मिळाले (२) हातीपायी खोल तुझिया रुतले खिळे दुधारी (२) मी रोगमुक्त झालो फटके तुला मिळाले जखमी करुनि तुजला मला सर्वरे मिळाले (२) पाहुनी येशू तुजला धिक्कारले जगाने (२) पावे कृपा मी आता शापच तुला मिळाले जखमी करुनि तुजला मला सर्वरे मिळाले (२) मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले (२) जखमी करुनि तुजला मला सर्वरे मिळाले (२) मला सर्वरे मिळाले (२)