या सर्व मिळूनी गाऊ या

मराठी

या सर्व मिळूनी गाऊ या गीत वैभवी ख्रिस्ताचे गीत गाऊ ऐक्याचे, हालेलूया विजयाचे -ध्रु ही आनंदे जमली आज मंडळी ऐक्याची ही शुभ्र वस्त्र ल्याली, खरी नवरी ख्रिस्ताची जयघोषे दुमदुमले हे मंदिर ख्रिस्ताचे -१ हे पाचारण आम्हां अद्भूत प्रकाशाचे हा जन्म नवा आमुचा धन्य वारीस स्वर्गाचे एक आत्मा एक प्रभू आम्ही एक शरीर प्रभूचे -२ ख्रिस्ती तरुणांचा मेळा आला दाही दिशांमधुनी दिशा नगरीच्या चारी दुमदुमल्या भजनांनी महा एक संघशक्ती संजिवन आत्म्यांचे -३ ही समई मंडळीची प्रभु ठेव तुझ्या पायी अशी युगेयुगे जळू दे तव ज्योती आत्म्याची हालेलूया हालेलूया गीत गाऊ ऐक्याचे -४