मराठी
येशूच्या रक्तें भरलें
धुण्याचें कुंड जाण,
जे पापी त्यांत घातले
ते होती शुद्धप्राण
तो खांबीं मरणारा चोर
त्यामुळे हर्षला,
तेणेंचि माझा दोष घोर
पुसेल सगळा
हे प्रभु, तुझें रक्तमोल
कधीं न संपणार
देवाचें सर्व प्रिय कूळ
तूं तेणें खंडणार
हा रक्तओघ वाहतां
मीं भावें पाहीला,
तेथुनि स्तुति करितां
उद्धार गाईला
मी ह्या जगांत राहतां
करीन स्तवनें,
व प्राण अंतीं सोडितां
अनंत गायनें