शेवटीं, प्रभुराया,

मराठी

शेवटीं, प्रभुराया, बिलगलों तुझिया पायां गेला रे गेला माझा, आजवरी जन्म वायां -ध्रु तुझा मी शिष्य थोर शिष्टधर्मी धुरंधर वाटलें अभिमानें, आतां लाज वाटे फार -१ मीपणें फसविलें, तुला मला दुर केलें, सर्वथा स्वमनाचें, तुझ्या नावें दास्य केलें -२ मजला बुद्धि नाहीं, बळ नाहीं, ज्ञान नाहीं तूंच रे तूंच माझें, आतां ख्रिस्ता, सर्व कांहीं -३ मजला दृढ धरीं, नको जाऊं देऊं दूरीं, एवढी भीक घालीं, वाट पाहतों मी दारीं -४