हर्ष वाटतो,

मराठी

हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो -१ येशू तारितो हो, मला येशू तारितो, यामुळेंच माझा जीव बहु आनंदतो -२ प्रेम दावितो हो, येशू प्रेम दावितो प्रेमानेंच लहानथोरां तो बोलावितो -३ प्रिय वाटतो हो, येशू प्रिय वाटतो, माझें तन, मन, धन, त्याला अर्पितों -४ हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो -५