‘होईल वृष्टी कृपेची’,

मराठी

‘होईल वृष्टी कृपेची’, ईशप्रेमोक्ती असे, तेणें तुष्टी पुष्टि यांची वृद्धि जगीं होतसे ध्रु- वृष्टी कृपेची ! वृष्टि कृपेची हवी बिंदु येताती, दयेची आम्हां सुवृष्टी हवी ‘होईल वृष्टि कृपेची, स्फूर्तिदायी, थोर ती ये झोड भारी वारीची, खिंड्याटेकाडांत ती ‘होईल वृष्टी कृपेची, देवा, करावी आतां स्वोक्ति करा स्वामी साची, द्या हर्ष अपेक्षितां ‘होईल वृष्टी कृपेची, साधा प्रभू इष्ट काज, ऐसी विनंती ख्रिस्ताचे नावें करितसुं आज