अगे कुमारी, यशस्वी

मराठी

अगे कुमारी, यशस्वी तारकापरी तेजस्वी विश्व जयानें निर्मिलें तया तूं स्तन पाजिलें हव्वेनें जें गमविलें, तव सुतें मिळविलें, द्वार स्वर्गाचें मोकळें तुझीयाद्वारें जाहलें तुझ्याद्वारें या जगतीं प्रकाश करी वसती, सद्भक्‍तांनो उल्हासा हो, केवढा अद्‍भुत लाहो ! हे येशू कुमारीसुता, तुला असो मान, सत्ता, मान असो पितयाला, त्यासहित सदात्मयाला