अनंतकर्मे ईश्वरी,

मराठी

अनंतकर्मे ईश्वरी, ते मोठे चमत्कार तो बैसे वादळावरी समुद्र ताबेदार अचाट सूत्र ईश्वरी, अतर्क्य त्याचें ज्ञान, जें योजी तें तो सत्वरीं सिद्धिस नेई जाण नका धरूं दीनांनो भय, जे मेघ आले घोर ते तुम्हांसाठी यशोमय देती प्रसाद थोर प्रभू विरोधी भासला तरी वंदावें नांव बाहेर मात्र रुसला, अंतरी प्रेमभाव देवाचे बेत प्रगटून सुवेळीं कळती, कुरुप कळ्या ऊमलून सुपुष्पें निघती अभाविकाला कळेना ईश्वरी मर्मसार, साधील देव योजना तेव्हां समजणार