अनुभूति भक्तीं, स्वर्गाचेंच दार

मराठी

अनुभूति भक्तीं, स्वर्गाचेंच दार परम सुंदर, प्रार्थना हें अहा प्रार्थना हें, पवित्र मंदिर येथे परात्पर, भक्तांसवें स्वर्ग पृथ्वीमध्यें, उभारीला जिना तयाचें प्रार्थना, नाम साजे प्रार्थना पित्याची, मांडीच केवळ चढें वर बाळ, लडीवाळें प्रेमाचा वर्षाव, आत्म्याचा प्रकाश, आसवें सहास, प्रार्थना हे ख्रिस्तशिष्य म्हणे, ख्रिस्तासंगें जाणें देवा आलिंगणें, प्रार्थना हें !