अर्पितों प्रभुला सर्वच कांहीं,

मराठी

अर्पितों प्रभुला सर्वच कांहीं, त्वरेनें माझ्या मनीं तूं राहीं संसार माझा समजुनि गमतों, निशिदिनिं खटपट त्याची मी करितों, तुझा मी आतां जाणुनि नमितों ख्रिस्ता, दयेने दीनास पाहीं बुद्धि जी, दिलि तूं माझिच वाटे, गर्वानें फुगुनी हृदय फाटे शोकानें आतां कंठ हा दाटे, प्रभू, मी पापी ! किती तूं साही ! किती मी हट्टी ! ऐकें न वाणी माझीच इच्छा नेहमी वाणीं सर्वचि अर्पी आतां हा प्राणी तुजवांचुनीया कुणीच नाही तनु ही झिजवीं तुझ्याचि पायीं, मन हें लावीं तुझ्याचि ठायीं, धन हें खर्ची तुझ्याचि कार्यी सर्वस्व माझें तुलाच वाहीं