आज ख्रिस्त ऊठला,

मराठी

आज ख्रिस्त ऊठला, हालेलूया ! सण वार सोवळा, जयजयकार करा हो ! क्रूसावरी मरुनी, हालेलूया ! दंड दिला भरुनी जयजयकार करा हो ! आज ख्रिस्त या गाऊं, हालेलूया ! आपुल्या राजा स्तवूं, जयजयकार करा हो ! क्रूस, थडें भोगीलें, हालेलूया ! तेणें पाप्यां तारीलें जयजयकार करा हो ! पूर्ण त्यानें खंडणी हालेलूया ! केली, दु:खें भोगूनी, जयजयकार करा हो ! आतां राजा विराजे, हालेलूया ! भूस्वर्गी नाम गाजे जयजयकार करा हो !