आज तूं साक्षि जाहला

मराठी

आज तूं साक्षि जाहला जग तुजवरतीं सारें उठलें परि तव मुळिं नच धैर्य गळालें मुगुट मिळविला गुडघे टेंकुनि विनत होउनी ध्यान मग्र तूं प्रभुच्या चरणीं दुष्कृत ताडण सहन करुनी आढळ राहिला प्रस्तरघावे वाहे शोणित तरी अरिस्तव देवा प्रार्थित प्रभु येशू तुज देउन दर्शन देत बळ तुला तव वदनावरी तेज फांकलें तुला धन्यपद सत्य मिळालें साक्ष्यांमाजीं परम थोर तूं विजय पावला देव पित्याला नमन सदाचें देव सुताला गैरव साचें पवित्र आत्मन‍ सारा महिमा घेई स्तुति तुला