आजी ख्रिस्त चढतो,

मराठी

आजी ख्रिस्त चढतो, हालेलूया ! सिंहासनीं बैसतो हालेलूया ! वधलेला कोंकरा, हालेलूया ! स्वर्गी जातो माघारा, हालेलूया ! तेथें पावे तो सत्कार हालेलूया ! उघडतां स्वर्गद्वार हालेलूया ! पापहर्त्ता तेजस्वी हालेलूया ! आला राजा वैभवी हालेलूया ! स्वर्ग राजा स्वीकारी, हालेलूया ! पृथ्वी प्रिय त्या वरी, हालेलूया ! आसनीं आरुढ तो, हालेलूया ! तरी आम्हां स्मरतो, हालेलूया ! पाहा, तो उभारी हात, हालेलूया ! दावी प्रेमचिन्हें त्यांत, हालेलूया ! भक्‍तां देई तो दयाळ, हालेलूया ! आशीर्वाद सर्वकाळ, हालेलूया ! आम्हांसाठी सदोदित हालेलूया ! यज्ञद्वारें विनवीत, हालेलूया ! फळ प्रथमचि तो, हालेलूया ! जागा सिद्ध करितो, हालेलूया ! प्रभो, तूंचि दृष्टीपार, हालेलूया ! तार्‍यांहुनि दूर फार, हालेलूया ! तरी तुला शोधायास, हालेलूया ! तेथें ओढी सगळ्यांस, हालेलूया !