आदि जन्म - घोष तो रानीं

मराठी

आदि जन्म - घोष तो रानीं पडला दूतांचा, मेंढक्यांच्या कानीं वस्ती त्यांची ऐन हिंवाळ्यांत असतां मेंढरांपायीं रानांत धन्य पर्व ! धन्य नाताल ! जन्माला ईस्त्राएल -नृपाल ! एकाकी तारा उदेला झळकत पूर्व दिशेला तत्प्रभा म्हणती भूवर दिसतसे जनां अष्टौप्रहर त्याच्याचि धरुनी मार्गास पुसतां, धुंडीतां राजास ज्ञानी तिघे देशांहून दृढ निश्चयातें आले करुन वायव्येस तारा रोखून बेथ्लेमापावेतों येऊन, निद्रित येशू ज्या घरांत, त्यावरी राही अचल शांत ज्ञानी तै जाऊनि घरांत, करुनि बाळा प्रणिपात, अर्पिती तया बहुमोल दानें, सुवर्ण, ऊद, बोळ तरी एकचित्तें हो जन, करूं या प्रभूचें स्तवन निर्मिलें त्यानें भूस्वर्गास, स्वरक्‍तें खंडिलें आम्हांस